• Book name: बदलत्या ग्रामसंस्कृतीचा वेध
• Language: मराठी
• Author: संपादक -डॉ.श्रीकांत पाटील
• Category: परीक्षणे (लेख )
• Publication: तेजश्री प्रकाशन
• Pages: १३४
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788194460428
सचिन वसंत पाटील हे असे मृत्युंजय लेखक आहेत, की ज्यांनी जीवघेण्या अपघातातून आलेल्या अपंगत्वावर मात करत आपल्या सर्जनशील लेखनात सातत्य राखले आहे. त्यांचा 'सांगावा' हा कथासंग्रह २००९ मध्ये प्रकाशित झाला. आजवर ह्या कथासंग्रहाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आहेत. मान्यवर समीक्षकांनी ह्या कथासंग्रहाची आवर्जून नोंद घेतली आहे. काहींनी 'सांगावा'तील बदलत्या ग्रामसंस्कृतीचा वेध घेतला आहे. काहींनी ग्रामीण लोकजीवनातील विविध पैलू अधोरेखित केले आहेत. काही समीक्षकांनी 'सांगावा'च्या भाषाशैलीचा मागोवा घेतला आहे. 'सांगावा'तील कथाबीजे, कथांचा कालावकाश, संवाद, कथेतील नवता, प्रतिमा-प्रतीकांचा वापर, म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर, प्रसंगवर्णनातील चित्रमयता इ. विविध अंगांनी ह्या कथांची समीक्षा ह्या अभ्यासकांनी केली आहे. समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय अंगांनीही 'सांगावा' तील कथेची चिकित्सा काही संशोधकांनी केली आहे.
एकंदरीत 'सांगावा' चे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन असे ह्या लेखांचे स्वरूप आहे.
साहित्याभ्यासक डॉ. श्रीकांत पाटील यांनी 'सांगावा' वरील सर्व लेखांचे साक्षेपी संपादन
करून 'बदलत्या ग्रामसंस्कृतीचा वेध' हा अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रंथ सिद्ध केला आहे.
त्यांनी लिहिलेली प्रस्तावना शोधनिबंधाइतकीच मौलिक आहे.
एखाद्या कलाकृतीचा किती विविध अंगांनी अभ्यास केला जाऊ शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय.
मराठी कथेची स्थितिगती समजावून घेण्यासाठी अभ्यासकांना प्रस्तुत ग्रंथ उपयुक्त
ठरेल, असा विश्वास वाटतो.
'सांगावा' चे लेखक सचिन पाटील आणि प्रस्तुत
ग्रंथाचे संपादक डॉ. श्रीकांत पाटील यांचे मनापासून, अगदी मनापासून अभिनंदन!
~ डॉ. सुरेश सावंत, नांदेड.