गावठी गिच्चा | Pustak Dukan
SELLING PRICE :
+ SHIPPING FEE :

Null

-15% offer कथा / Stories Books price_Rs170
गावठी गिच्चा

गावठी गिच्चा

-15% offer कथा / Stories Books price_Rs170

Print Friendly and PDF
Short Description:
गावठी गिच्चा | सचिन पाटील | कथासंग्रह | तेजश्री प्रकाशन | Gavathi Gichcha | Sachin Patil | Collection of marathi stories | ISBN: 9788194657255

Description of the book

गावठी गिच्चा - सचिन पाटील, कथासंग्रह

 Book name: गावठी गिच्चा

 Language: मराठी

 Author: सचिन पाटील

 Categoryकथासंग्रह

 Publicationतेजश्री प्रकाशन

 Pages: १४४  

 Binding: पेपरबॅक बाइंडिंग

 ISBN: 9788194657255

         सचिन पाटील हे नव्या पिढीतील ग्रामीण साहित्यातील सुखद अशास्थान आहे. 'सांगावा' आणि 'अवकाळी विळखा' या कथासंग्रहा पाठोपाठ आता ते 'गावठी गिच्चा' हा एक झकास ग्रामीण कथासंग्रह वाचकांसाठी घेऊन आले आहेत

        गावाशी ज्यांची लहानपणीच गट्टी झालेली आहे, ते नंतर शहरात गेले तरी गाव त्यांच्या मनात वसती करून असते, जन्मभर पाठ सोडत नाही. त्यांच्या मनात रुजलेले वातावरण, निसर्ग, माणसे, नातेसंबंध, स्त्री-पुरुषांचे खास गावाकडचे नमुने, तिरपागडेपणा आणि तरीही एकमेकांना समजून घेणे, अडी-अडचणी निवारणेअशा एक की दोन अनेक बाबी कथारूप घेऊन कागदावर उतरतात, तेव्हा लेखकाबरोबरच वाचकही त्या अनुभवात गुरफटत जातो

        वरवरच्या ताठर बहिणीच्या मनातला मायेचा 'उमाळा', कधी एखाद्या तरुणीच्या भीतीवर मात करणारा 'कोयता', कधी 'करणी'सारख्या अंधश्रद्धेतून होणारा गैरसमज, नवऱ्याची गंमत करीत 'उपास' घडवणारी बायको, 'तंटामुक्ती'सारखे एखादं गावात नवीन आलेलं वारं आणि घट्ट मैत्रीच्या दोघा-चौघांच्या बनेलपणाने एखाद्याच्या बायकोला दाखवलेला 'गावठी गिच्चा'... हिसकाअशा अनेक छोट्या-मोठ्या अनुभवांच्या अस्सल गावरान वातावरणात नेणाऱ्या कथांचा हा नवीन संग्रह वाचायलाच हवा…'गावठी गिच्चा'ने सचिन पाटील आता ग्रामीण कथाकार म्हणून स्थिर झाले आहेत. त्यांचे अभिनंदन आणि भावी लेखनासाठी शुभेच्छा! 

                                 - डॉ.तारा भवाळकर