• Book name: उन्मेष सर्जनतेचा
• Language: मराठी
• Author: संपादक- भारत बंडगर
• Category: माहितीपर / शालेय
• Publication: पद्मरत्न प्रकाशन
• Pages: १००
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788194867197
अध्ययन-अध्यापनाला
गती देण्यासाठी आनंददायी शिक्षण ही अतिशय आवश्यक अशी बाब आहे. परिणामकारक
अध्यापनासाठी संचित ज्ञान आवश्यक असते, त्यासाठी शिक्षक प्रकल्प करतात. अध्यापनात येणाऱ्या
तात्कालिक समस्यांच्या निराकरणासाठी कृतीसंशोधन करतात.तर अध्यापनातून आनंद
घेण्यासाठी व तो मुलांना देण्यासाठी नवोपक्रम करतात नाविन्याचा ध्यास आणि
विद्यार्थी विकासाची आस हेच या उपक्रमांचे अंतभूत वैशिष्ट्य असते.
उन्मेष सर्जनतेचा हे जिल्हा व राज्य
स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त नवोपक्रमांचे नाविन्यपूर्ण असेच संपादन आहे. प्रभावी
अंमलबजावणी झालेल्या गुणवत्तापूर्ण नवोपक्रमांची अध्यापकांना ओळख व्हावी. त्यांनी
उद्दिष्ट, गरज, महत्त्व, वेगळेपण व कार्यवाही समजावी. नवोपक्रमांच्या माहिती बरोबर त्यांच्या
तंत्रशुद्ध लेखनाचे उत्तमोत्तम वस्तुपाठ पाहायला मिळावेत हा हेतू व तळमळ या
ग्रंथसंपादनामागे दिसून येते. भाषाध्यापन, आरोग्य शिक्षण या
बरोबर कला, क्रीडा क्षेत्रातील नवनवीन उपक्रमांचे
सर्वांगसुंदर अशा प्रकारचे हे संपादन आहे. नवनवीन संकल्पनांची झळाली, तेज, प्रकटीकरण, अभिव्यक्ती
असा ग्रंथशीर्षकाचा अर्थ आहे. सुयोग्य निवड, विविधांगी विषय
व शास्त्रशुद्ध मांडणी असणारा आशय ही या संपादनाची वैशिष्ट्ये आहेत.'उन्मेष सर्जनतेचा' हा संशोधन मूल्य व उपयुक्ततामूल्य
असणारा ग्रंथ संपादन केल्याबद्दल संपादक श्री.भारत बंडगर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
- डॉ.श्रीकांत पाटील