मातीखालचे पाय | Pustak Dukan
SELLING PRICE :
+ SHIPPING FEE :

Null

-15% offer कादंबरी / Novel Books price_Rs125
मातीखालचे पाय

मातीखालचे पाय

-15% offer कादंबरी / Novel Books price_Rs125

Print Friendly and PDF
Short Description:
मातीखालचे पाय | बाबू बिरादार | कादंबरी | गणगोत प्रकाशन | Matikhalche Paay | Babu Biradar | Novel | Gangot Prakashan | ISBN: 9788194569770

Description of the book

मातीखालचे पाय - बाबू बिरादार, कादंबरी |

 Book name: मातीखालचे पाय

 Language: मराठी

 Author: बाबू बिरादार

 Categoryकादंबरी

 Publicationगणगोत प्रकाशन

 Pages: ९६

 Binding: पेपरबॅक बाइंडिंग

 ISBN: 9788194569770

        अल्पाक्षरी मंत्रात्मक भाषा आणि वास्तवाची सुजाण जान हे बाबू बिरादार यांचे सामर्थ्य, माणूस आणि त्याचे अतर्क्य व्यवहार हे त्यांच्या चिंतनाचे प्रांत, आणि म्हणूनच आजच्या संक्रमण काळातला माणूस त्यांना महत्त्वाचा वाटतो. हे संक्रमण हळूहळू आज ग्रामीण जीवनातही येते आहे. परंतु नियतिबद्धता निसर्गसन्मुखता आणि परंपरांचा पगडा यातून ग्रामीण वास्तव साकारत जाते म्हणूनच या वास्तवातून जन्मणाऱ्या माणसांचा पीळ सहजासहजी उकलणारा नसतो. 

    अशा या पीळदार जीवनाचे चित्र या कादंबरीतून बाबू बिरादार यांनी विलक्षण ताकदीने साकारिले आहे. पांढरी आणि काळी ला न्याय देत देत त्यांनी येथे पांढरीत घडणारे संक्रमण साकारिले आहे. परंतु पांढरीतील पारंपरिक तत्वज्ञान ही शेवटी या संक्रमणाला आवरू शकत नाही, हतबल होते. आणि पीळ तर उकलत जातच... त्यातून संघर्ष वाढतच जातो. परंतु प्रत्येक संघर्षात पायही शेवटी मातीचेच असतात याची जाण बाबू बिरादारांना आहे, मातीची जाण आणि मातीचा विश्वास यातून त्याचा माणूस साकार होतो. ही जाण आणि विश्वास यातूनच बाबू बिरादार हे उद्याच्या मराठी कादंबरीचे आशास्थान आहेत यात काही शंका नाही.

-डॉ.नागनाथ कोत्तापल्ले