• Book name: कावड
• Language: मराठी
• Author: बाबू बिरादार
• Category: कादंबरी
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: ९६
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788194569763
आकाशाच्या वाटीत दुधाची साय भरावी तसे चांदणे पंढरीच्या गल्लीबोळांतून भरले होते. विठ्ठल मंदिर गर्भारपणाच्या तेजाने तृप्तावले होते. टाळ मृदंगाच्या निनाद वातावरणात भरून राहिला होता. क्षीरसागरीचे नक्षत्र स्नानासाठी भीमाकाठी उतरले होते. मास्तराचे ओले डोळे विष्णुग्दावर स्थिरावले आणि क्षणात त्यांच्या डोळ्यांपुढे कमळीचा सुरकुतलेला चेहरा समोर आला. खरंच आपल्यास रक्तमासाचे बोल कळाले नाहीत. आपण जीवनभर संवाद स्वत:शीच केला. नकळत विणत गेलेल्या रेशमी कोषात आपणच अडकून पडलोत. आपल्याभोवती कुणीतरी प्रदक्षिणा घालतो आहे... याचा विसरच पडला. आपण आपल्याच नादात! विणेच्या तारेसारखं नादावत राहिलो. कधी डोंगर पालथा घालणाऱ्या रामदासासारखे तर कधी प्रतिसृष्टीचे वेड घेतलेल्या विश्वामित्रासारखे! तर कधी दुर्वासासारखे शाप देतच गेलो! काय केले हे.....?