रामपाडा | Pustak Dukan
SELLING PRICE :
+ SHIPPING FEE :

Null

-17% offer Books price_Rs125
 रामपाडा

रामपाडा

-17% offer Books price_Rs125

Print Friendly and PDF
Short Description:
रामपाडा | सुवर्णा भिवसने | कादंबरी | गणगोत प्रकाशन | Rampada | Novel | Suvarna Bivsane | Gangot Prakashan | ISBN: 9788195144433

Description of the book

रामपाडा - सुवर्णा भिवसने, कादंबरी

 Book name: रामपाडा

 Language: मराठी

 Author: सुवर्णा भिवसने

 Category: कादंबरी

 Publication: गणगोत प्रकाशन

 Pages: ९६

 Binding: पेपरबॅक बाइंडिंग

 ISBN: 9788195144433

    घराच्या उंबऱ्याशिवाय आणि शेताच्या बांधाशिवाय बाहेरचं जग कधीच न पाहिलेल्या रामपाड्यातील माणसांचा कायापालट, गावमंत्र जगणाऱ्या व जपणाऱ्या चमेली पवार या कादंबरीतील नायिकेनं स्त्रीसंघटनेची ताकद दाखवून, गाव विश्वाचा नकाशा असतो, हे सिद्ध केलंय, याचं मनोहारी व प्रत्ययकारी चित्रण लेखिका सुवर्णा भागवत भिवसने यांनी अधोरेखित केलं आहे.

    गावातला सर्वार्थाने सार्वजनिक अंधार सारून, पारदर्शक कारभाराची पावती मिळवून, दीनदुबळ्यांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी ही कादंबरी करते.

       समाजकारण, राजकारण, अर्थकारण यातील गुंता समर्थपणे सोडवून, समस्येचे निराकरण करत, लेखिकेने गावसंबंधाचे आकलन सूक्ष्मपणे टिपले आहे.

    निवेदनाची अप्रतिम शैली, व्यक्तिरेखांचे हुबेहूब चित्रण, यथार्थ गाववर्णन, कथानकाची चढत्या क्रमाची पकड आणि नाट्यमय प्रसंगांची शब्दगुंफण, यामुळे ‘रामपाडा’ ही कादंबरी वास्तवतेचे दर्शन घडविते !

     - वीरभद्र मिरेवाड, नायगाव (बा.) जि. नांदेड