वटवृक्षाच्या छायेत | Pustak Dukan
SELLING PRICE :
+ SHIPPING FEE :

Null

-20% offer व्यक्तिचित्रण / Characterize Books price_Rs240
 वटवृक्षाच्या छायेत

वटवृक्षाच्या छायेत

-20% offer व्यक्तिचित्रण / Characterize Books price_Rs240

Print Friendly and PDF
Short Description:
वटवृक्षाच्या छायेत | प्रा.डॉ.लक्ष्मी पुरणारोवार (पुररोड) | चरित्र | गणगोत प्रकाशन | Vatvrukshyachya Chayet | Dr Laxmi Purnarovar (Purrod) | Character

Description of the book

वटवृक्षाच्या छायेत - प्रा.डॉ.लक्ष्मी पुरणारोवार -पुररोड, चरित्र

 Book name: वटवृक्षाच्या छायेत

 Language: मराठी

 Author: प्रा.डॉ.लक्ष्मी पुरणारोवार (पुररोड)

 Categoryचरित्र

 Publicationगणगोत प्रकाशन

 Pages: २२४

 Binding: पेपरबॅक बाइंडिंग

भाई गुरुनाथराव कुरुडे यांना मानाची जयक्रांति..

    प्रदीर्घ काळ महाराष्ट्र विधानसभा गाजविणारे भाई केशवराव धोंडगे यांच्या खांद्याला खांदा लावून अखंड संघर्षमय जीवन जगणारे स्वातंत्र्यसैनिक भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्याविषयी दोन शब्द लिहिणे हा माझा सन्मान समजतो. आपले संपूर्ण जीवन त्यांनी निःस्वार्थपणे कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या न्याय्य हक्काची प्रस्थापना करण्यासाठी खर्च केले. काही वाक्यांत त्यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य पकडणे अशक्य आहे. भाई गुरुनाथराव कुरुडे हे आध्यात्मिक वारसा असलेल्या कुटुंबवत्सल घरात जन्मले. संघर्षाची धगधगती मशाल म्हणजे अजातशत्रू भाई केशवराव धोंडगे. त्यांचा विश्वास संपादून त्यांचे कार्य अखंडपणे चालू ठेवणे हे प्रचंड अवघड काम होय. ते काम आजतागायत भाई गुरुनाथराव कुरुडे हे मनोभावे, कर्तव्यबुद्धीने चालवित आहेत. शेतकरी व कामगारांच्या जीवनात विकासाची पहाट उगवावी म्हणून आपले सर्वस्व त्यांनी पणाला लावले असून सेवाकार्याला आपले जीवन समर्पण केले आहे. भाई केशवराव धोंडगे यांनी ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये स्थापन करून असंख्य कुटुंबांना विकासाची प्रकाशवाट दाखविली. एका तालुक्यात सुरू झालेली; पण नंतर भाई धोंडगे साहेब व गुरुनाथराव यांच्या संयुक्त अहर्निश मेहनतीने शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी नांदेड व मराठवाड्यात वर्धिष्णू झाली. ही संस्था नांदेड जिल्ह्याचेच नव्हे, तर मराठवाडा व महाराष्ट्राचे भूषण होय. शिक्षणसंस्था ध्येयवादाने व पारदर्शकपणे चालविणे म्हणजे, सध्याच्या काळात सतीचे वाण होय. अशी संस्था उभी करण्यात भाई गुरुनाथ कुरुडे यांचे लक्षणीय योगदान राहिले आहे. अशा ध्येयवादी माणसाचे जीवनकार्य शब्दांकित करणे अवघड काम आहे. पण लेखिका डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार यांनी हे व्यक्तीचित्रण सहजपणे साकारले आहे. आजकाल शिक्षणक्षेत्रात भाई कुरुडे यांच्यासारखा गुणवत्तेचा, निष्ठेचा, प्रामाणिकपणाचा मनोहारी संगम क्वचितच दिसतो. भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या जीवनकार्याला सलाम, हार्दिक शुभेच्छा व मानाची जयक्रांति !!

-डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी खासदार