सूचना : पुस्तक उपलब्ध नाही, पुस्तक मागणी साठी मागणी फॉर्म/ इमेलद्वारे मागणी करावी. पेयमेंट करू नये.
• Book name: चैतन्याचा मोहर
• Language: मराठी
• Author: डॉ.रवीन्द्र
कानडजे
• Category: कथासंग्रह
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: ४८
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788193994986
'चैतन्याचा मोहर' हा डॉ.रवीन्द्र कानडजे यांचा पहिला कथासंग्रह. त्यातील आशय बाल-कुमारांच्या भावविश्वाशी संबंधित आहे. या संग्रहातील कथा लहान, पण अर्थपूर्ण, सुबोध पण वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या आहेत. कारण त्या बाल-कुमारांच्या मानसिक जडणघडणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जीवनमूल्यांचा आविष्कार करतात. घराची ओढ, आईची माया, इच्छाशक्तीचे महत्त्व, स्वातंत्र्याचे मोल, प्राण्यांचा लळा, पर्यावरणाचे आकर्षण आणि निसर्गाची किमया याविषयांचे कुतूहल जागे करणाऱ्या ह्या कथा आहेत. घटना-प्रसंगांचे नेमके चित्रण, भावपूर्ण संवाद, समर्पक तपशीलांची नोंद आणि त्यातून जाणवणारी जगण्याची उमेद यांचा उत्कट प्रत्यय या कथांतून आल्याशिवाय राहत नाही.
-अशोक कौतिक कोळी