• Book name: तू फक्त्त हो म्हण
• Language: मराठी
• Author: शरद पाटील
• Category: चारोळी संग्रह
• Publication: स्वरसिद्धी प्रकाशन, पुणे
• Pages: ९६
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
कवी शरद पाटील यांचा हा दूसरा दुसरा चारोळी संग्रह. प्रेमात पडलेल्या तरुण युवकाच्या
मनातील भाव भावना या संग्रहातून कवी शरद पाटील यांनी शब्दबद्ध केल्या आहेत.
- ती म्हणाली
सुखी रहा, मला घरचं बंधन आहे
पण तिच्या
सुखासाठीच, माझं आयुष्य आंदन आहे
- प्रिये तुझे केस जेंव्हा, चेहऱ्यावरती झुकतात
माझ्या वेड्या
काळजाचे, ठोके हळूच चुकतात
- पावसाची ओली सर, नेहमीचं गळकं घर
आधी मी ओंजळ धरतो, नंतर तू ओंजळ धर
- कितीही दु:ख लपविलं तरी, डोळ्यातील पाणीच खरं वाटतं
मग दारात उभं राहण्यापेक्षा, पावसात भिजलेलं बरं वाटतं
या आणि अशाच भन्नाट रचनांची मांडणी या संग्रहातून कवी
शरद पाटील यांनी केलेली आहे.