• Language: मराठी
• Author: प्र.श्री.जाधव
• Category: बालकादंबरी
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: ५६
• Binding: पिन बाइंडिंग
• ISBN: 9788193994962
बालमानस लक्षात घेऊन लेखन करणारे बालसाहित्यिक प्र.श्री.जाधव हे मराठी वाचकांना परिचित आहेत. 'चिमणगाणी' या संग्रहाने ही गोष्ट अगोदरच सिद्ध झालेली आहे. 'गोंदू' या कुमार कादंबरीने ही बाब पुन्हा अधोरेखित होत आहे.
ही कादंबरी गोंदूचा संघर्षमय आणि यशस्वी आलेख रेखाटणारी समर्थ कलाकृती आहे. ती जशी गोंदूची गोष्ट आपल्याला सांगते तशीच ती 'टिपू' या त्याच्या जिवलग आणि विश्वासू कुत्र्याचीदेखील गोष्ट सांगते. गोंदूच्या भावजीवनात मित्र, भाऊ, जिवलग अशा विविध रूपांमध्ये टिपूचे अनन्यसाधारण स्थान आहे. प्रवाही आणि सूत्रबद्ध पद्धतीने ही कादंबरी हळूहळू उलगडत जाते. वाचकाची जिज्ञासा, उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवते. विविध घटना आणि प्रसंगाचे लेखकाने सूक्ष्मपणे वर्णन केले आहे. मराठी बालसाहित्यात अलीकडच्या काळात समर्थ असा ग्रामीण भागातील बालनायक सहसा भेटत नाही. या पार्श्वभूमीवरील गोंदूचे आगमन स्वागतार्ह आहे.
-डॉ. पृथ्वीराज तौर
मराठी विभाग, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड