• Book name: काळजापासून काळजांपर्यंत
• Language: मराठी
• Author: प्रमोद मोहिते
• Category: कविता संग्रह
• Publication: परिसस्पर्श पब्लिकेशन
• Pages: १२८
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788194040910
‘काळजापासून काळजांपर्यंत’ हा कवी प्रमोद महादेव मोहिते यांचा कवितासंग्रह. या संग्रहात एकूण ७६ कविता आहेत. या कविता स्वतः कवीनेच तीन विभागात विभागल्याने रसिकांना त्यांचे आकलन सोपे झाले आहे. कवी ग्रामीण भागातील असल्याने अस्सल ग्रामीण व गावठाणातील शब्द त्यांच्या कवितांत आढळतात.या संग्रहातील अनेक कविता अष्टाक्षरी व अभंग छंदात आहेत. मात्र अनेक कविता मुक्तछंदातही आहेत. त्या बहुतांशी दीर्घ स्वरुपाच्या आहेत. त्यांचे अनुभव ग्रामीण आणि शहरी भागाशी संबंधित असल्याने त्या कवितांतील भावदेखील संमिश्र आहे. या संग्रहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागाच्या सुरुवातीला अर्पण पत्रिकेसारखी दोन कडव्यांची कविता आहे.या संग्रहात प्रेमभंग स्वरूप कविता आहेत. तरीदेखील प्रेमभंगाने कवी डगमगला नाही. त्याने जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग चोखाळला आहे. एकंदरीत हा संग्रह विविध भावभावनांचे दर्शन घडवतो व वाचकांना विचारप्रवण करतो.
–प्रकाश क्षीरसागर, गोवा