• Language: मराठी
• Author: सचिन पाटील
• Category: कथासंग्रह
• Publication: तेजश्री प्रकाशन
• Pages: १७६
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788195018154
आजच्या काळातील शेती व शेतकरी यांना किती संकटांना
सामोरे जावे लागते याची जातीवंत कळवळ्यातून केलेली अभिव्यक्ती म्हणजे सचिन पाटील
यांचा 'अवकाळी विळखा' हा कथासंग्रह.
दु:ख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, व्यसन, शोषण आणि दुष्काळ हे शेतकऱ्याला छळणारे दुष्ट ग्रह
आहेत. या साऱ्यांचे लेखकाने खूप मनापासून चित्रण केले आहे, म्हणून या कथा विशेष भावतात. साऱ्या जगाच्या भुकेला
अन्न पुरवणारा शेतकरी उपाशी मरतो. जगाची लाज झाकणारा शेतकरी मात्र उघडा बोडका
असतो. सधन शेतकऱ्यापासून ते सजाधीशापर्यंत त्याला नाडतात, अडवतात, लुबाडतात. हे सनातन सत्य त्यांनी या संग्रहातील कथांमधून चित्रित केले आहे.
शिवाय खेडेगावातील मुले आई-बापाची उपेक्षा करतात. स्वत:चा ऊस कारखान्याला नेताना
अनेकांचे पाय धरावे लागतात. अशा अनुभवांनाही त्यांनी कथारुप दिले आहे.
या कथा भरपूर आनंद देणाऱ्या आणि ग्रामजीवनाचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या आहेत. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि भरपूर लेखन करावे अशी अपेक्षा करतो.
- डॉ.द.ता.भोसले.