• Book name: कोरोना काळात: मुलांसाठी कविता
• Language: मराठी
• Author: संपादन- वीरभद्र मिरेवाड
• Category: शैक्षणिक
• Publication: गणगोत प्रकाशन 
• Pages: ८४
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788194569701
वीरभद्र मिरेवाड हे विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक आणि सर्जनशील लेखक आहेत. कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात यत्किंचितही विचलित न होता त्यांनी आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेन विद्यार्थ्यांसाठी 'कोरोना काळात मुलांसाठी कविता' हा नावीन्यपूर्ण शालेय उपक्रम राबवून मुलांच्या ठायी ऊर्जा निर्माण केली. कवी वीरभद्र मिरेवाड हे सातत्याने साहित्य, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमातही सहभाग नोंदवतात. वीरभद्र मिरेवाड यांनी कोरोना काळात मराठीतील प्रसिद्ध साहित्यिकांशी व पाठ्यपुस्तकातील लेखक, कवींशी संपर्क साधून उत्तमोत्तम कविता मिळवल्या आणि त्या कविता कवीच्या आवाजात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या. कविता ऐकताना व कवीला प्रत्यक्ष पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद विलसत होता. मिरेवाड यांनी खुबीने तंत्रज्ञानाचा यथोचित उपयोग करून हा उपक्रम सर्वदूर व शाळाशाळांत पोहोचविला. या धाडसी उपक्रमाचे आता ग्रंथरूपात प्रकटीकरण होत आहे. ही आनंददायी बाब आहे. वीरभद्र मिरेवाड यांनी कोरोना काळात केलेल्या या शालेय कार्यासाठी ते'कोरोना योद्धाच ठरतात.
 
 WhatsApp
WhatsApp Call Us
 Call Us



 
 

 
 
 
 
 

