• Book name: गोसावी
• Language: मराठी
• Author: बाबू बिरादार
• Category: कादंबरी
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: १३६
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788194569749
देवकी पाण्याचा एक-एक घट डोळ्यावर रिकामा करू लागली. शिवालयावरून पारंब्या लोंबाव्यात तसे मोकळ्या केसातून बारवेचे पाणी धावू लागले. बारवेच्या पाण्याच्या स्पर्शाने नागफणा डुलावा तसा देवकीचा देह डोलू लागला. तिच्या देहावर पाणी थबकू लागले. पाणी आणि देवकी एकरूप होत चालल्या. वाळा, नागरमोथ्याचा सुवास न्हाणी घरातून गरम होत बाहेर पडू लागला. देवकीने नेहमीसारखे न्हाणीघरातील भिंतीकडे पाहिले. चोरून देहाकडे पाहणारा कावळा आज भिंतीवर नव्हता. त्याच्या जागेवरून गोसाव्याचा हुंदका घरंगळत यावा, तसे एक पांढरे ढेकूळ घरंगळत खाली आले! देवकी लगबगीने न्हाणी घराबाहेर पडली. घरात गेली. तेवणाऱ्या दिव्याच्या लालसर उजेडात लालजर्द पीतांबर ओल्या देहाला नेसवू लागली. त्याच्या घड्या देहावर घालू लागली तसतसा गोसाव्याच्या हंदक्यांचा आवाज देवघंटेसारखा पसरू लागला. देवकीने घाईने नक्षी कोरलेली पेटी उघडली आणि एक एक अलंकार देहावर बसवू लागली. कुंकवाच्या करंड्यात बोटे घालू समोरच्या आरशात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबास पाहन चंद्रकोर कपाळावर काढली. डाव्या हातावर मेघ जमा झाले होते आणि गोंदलेला मोरपिसारा उघडून नाचत होता!