सूचना : पुस्तक उपलब्ध नाही, पुस्तक मागणी साठी मागणी फॉर्म/ इमेलद्वारे मागणी करावी. पेयमेंट करू नये.
• Book name: मुलगा असावा प्रणवसारखा
• Language: मराठी
• Author: भगवान अंजनीकर
• Category: बाल-कादंबरी
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: ३२
• Binding: पिन बाइंडिंग
• ISBN: 9788194569787
कुमारमित्रांनो, ‘मुलगा असावा प्रणवसारखा' ही बालकादंबरी मी तुमच्यासाठी लिहिली आहे. ती तुम्ही वाचावी, यातील प्रणवशी तुमची मैत्री व्हावी, आपणही योग्य पाऊल उचलावे, यासाठी ही बालकादंबरी आहे.
वर्गात सहलीची सूचना येताच सर्वजण सहलीत सहभागी होण्याचा निर्णय घेतात. मात्र प्रणव एकटाच नकार देतो. सर्वजण त्यास सहलीला येण्यासाठी समाजवून सांगतात. आईवडिलसुद्धा सहलीला जाण्याविषयी आग्रह धरतात. 'मी सहलीला जाणार नाही' असे स्पष्टपणे जाहीर करतो. खरं तर सहलीच्या खर्चाचे ओझे आईवडिलांना पेलणार नाही. अगोदरच वह्यापुस्तकांचा खर्च झाला आहे, तेव्हा हा अनावश्यक खर्च कशाला करायचा? अशी स्वतःची भुमिका मांडतो. त्याचा निर्णय ऐकून आईबाबांना अभिमान वाटतो. तुम्हीसुद्धा प्रणवप्रमाणेच आपल्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा. अनावश्यक खर्च टाळावा, असे मला वाटते.
शिकत असताना शिक्षण घेणे, एवढेच आपले ध्येय असले पाहिजे. आपल्या शिक्षणातील अडथळे ओळखून ते दूर लोटले पाहिजेत. परीक्षा न देता पास होणार अशी वर्गात सूचना येताच सर्व विद्यार्थी आनंदीत होतात. वर्गनायक राजीव तर सर्व मित्रांना खाऊचे वाटप करतो. तेव्हा आपणांस राजीव व्हायचे आहे की प्रणव, हे तुम्हालाच ठरवायचे आहे. तुम्ही प्रणवची बाजू घ्याल, याची मला खात्री वाटते.
बालमित्रांनो, प्रणव तुमचा दीपस्तंभ आहे. असे समजून तुम्ही त्याच्यासारखे वागा म्हणजे तुम्ही या राष्ट्राचे उद्याचे शिल्पकार व्हाल, असे मला निश्चित वाटते. ही बालकादंबरी तुम्ही वाचावी, इतर मित्रांना वाचावयास द्यावी अशी विनंती मी तुम्हास करत आहे.
या कादंबरीचे मुखपृष्ठ तसेच आतील चित्रे प्रमोद दिवेकर यांनी रेखाटली आहेत. कृष्णा डीटीपी आर्टच्या सौ.कलावती घोडके यांनी पुस्तकाची छान मांडणी केली आहे. देगलूर येथील गणगोत प्रकाशनाचे प्रकाशक पांडुरंग निवृत्तीराव पुढेवाड यांनी उत्तम पुस्तक निर्मिती केली आहे. ही बालकादंबरी सर्वांना आवडेल असा मला विश्वास वाटतो.
- भगवान अंजनीकर