• Book name: निराळ्या
विश्वात जगताना
• Language: मराठी
• Author: डॉ.लक्ष्मी
पुरणशेट्टीवार
• Category: लेखसंग्रह
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: ११२
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788193994993
उपेक्षितांचे उद्गायन : निराळ्या विश्वात जगताना डॉ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार यांचे 'निराळ्या विश्वात जगताना' हे पुस्तक म्हणजे उपेक्षितांचे उद्गायन होय. जिल्हा महिला व बालविकास संस्थेमध्ये काम करताना आलेले जिवंत अनुभव या पुस्तकात पानोपानी सापडतात. निरागस, निष्पाप अशा पौगंडावस्थेतील बालकांचे भावविश्व उभं करताना लेखिका डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार यांची लेखणी अधिक संवेदनशील होते. ही उगतिकता अधोरेखित करताना लेखिका म्हणून त्या अस्वस्थ होतात. अशा मुलांसाठी आपण काहीतरी करावं ही त्यांची मनोभावना अधिक बोलकी आहे.
हे लेखन म्हणजे पोलीस प्रशासन, बालकल्याण समिती, बाल न्यायालय आणि बालविकास कार्यालयाचा स्टाफ यांच्यामधील संवादसूत्र होय. माणसांच्या चांगल्या-वाईट गुणांचा हा लेखाजोखा उपेक्षितांच्या अंध:कारमय विश्वात उजेडवाटा निर्माण करणारा आहे. लेखिकेचे हे अनालंकृत निवेदन, नात्यांमधला संघर्षही सांगून जाते. या संघर्षकथा आणि यशोगाथा सांगून झाल्यावर डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार यांनी केलेले निर्णायक विधानं काहीतरी संदेश देऊन जातात.
-देवीदास फुलारी, नांदेड