• Book name: अनोखी प्रीतकळी
• Language: मराठी
• Author: चंद्रकांत चव्हाण
• Category: कादंबरी
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: २४०
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788193944931
प्रेमाची शिदोरी ही पदरात कशी, केव्हा पडेल हे कळत नाही. दोन डोळ्यांची नजरानजर भिडते आणि आपुलकीच्या आकर्षणाच्या लहरी एकमेकांस ओढ निर्माण करतात. विश्वासाचा धागा अतुट, मजबूत बनत जातो. मग प्रीतकळी फुलायला लागते. अशी प्रीतकळी फुलावी आणि लग्न करून संसाराच्या बंधनात कायमच आपल म्हणून राहाव, सर्वांची इच्छा असते; पण ‘अनोखी प्रीतकळी' यापेक्षा वेगळी आहे. जरी प्रेमकहाणी असली तरी, त्याग हा प्रेमाचा आत्मा आहे. प्रेमाची उत्कटता जेव्हा शिगेला पोहोचते. एक दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही, असे त्यांना वाटू लागते. अशावेळी ती प्रीतकळी जर दुसऱ्याची झाली, जर त्या प्रेमीयुगलाची ती अधुरी प्रीतीची कळी जन्मभर आठवणीतून जात नाही; पण आपलेपणाचा बंध कमी न होता तिच्या दुःखात तिला मदत करण्याची इच्छा मनात येते. तिचे दुःख, तिच्या वेदना आपल्या होतात, तेव्हा खरे प्रेम उदयास येते. अशीच खरी 'अनोखी प्रीतकळी' तुम्हा-आम्हाला आवडेल.
आजचे तरूण प्रेम दिसण्यावर करतात. काही कारणाने ती जर भेटत नसेल तर तिचा खून करतात. तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून तिला विद्रूप करतील. कधी स्वतःला संपवतील. कधी दोघेही पळपुट्यासारखे आत्महत्या करतील. अशा दुष्ट वागण्याने खऱ्या प्रेमाला मुकतात. प्रेम ओरबाडून मिळत नसतं. ते प्रेमानंच मिळवावं लागतं. नाही मिळालं तरी आपल्या प्रेमाच्या माणसाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे प्रेम. 'अनोखी प्रीतकळी' मध्ये त्यागासोबत सकारात्मक विचारांची सांगड साध्या-सोप्या भाषेत कथन झालेली, जीवनाची मूल्यवान तत्त्वप्रणाली नवयुवकांना उजेड दाखविण्याचा प्रयत्न करेल.
संसाराच्या रथाला दोन्ही चाके सारखी असतील तर संसार सुरळीत चालतो. जोडीदार जर व्यसनी, ऐतखाऊ, बिनधास्त वागणारा असेल तर दुसऱ्या जोडीदाराचं सहजसुंदर नियोजन बिघडून जातं. सोबत असणारी जोडीदारसह, आई, वडील, सासू सासरे यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. चांगल्या गुणाची शक्ती कमी पडते आणि वाईट प्रवृत्ती वरचढ होते. तेव्हा सगळे लयास जाते. काहीही दोष नसताना सोबतच्या व्यक्तींना शिक्षा मिळते. वारस असावा; पण लाडानं बिघडवून वाढविण्यापेक्षा जबाबदारीची जाणीव करून त्याला संस्काराचे डोस पाजवले तरच खरा वारस तयार होईल. हेच 'अनोखी प्रीतकळी' सांगण्याचा प्रयत्न करते.
'अनोखी प्रीतकळी' खरंतर ही नावावरून प्रेमकहाणी असली तरी प्रेम हा आत्मा आहे. त्याशिवाय संसारातील नातीगोती, समाजातील प्रथा, दारूमुळे होणारी दुर्दशा, एच. आय. व्ही.सारख्या आजाराचा भयंकर परिणाम अशा विविध विषयांना स्पर्श झालेला आहे.
-देवीदास फुलारी, नांदेड