• Book name: व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्यातील लोकतत्त्व: भाग-२
• Language: मराठी
• Author: डॉ. संगीता गणपतराव घुगे
• Category: संशोधन लेखन
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: २६०
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788195144426
प्रा. डॉ. संगीता घुगे यांनी सर्जनशील लेखिका आणि व्यासंगी समीक्षक म्हणून मराठी सारस्वतामध्ये आपली नाममुद्रा उमटवली आहे. कविता, कथा आणि समीक्षा इ. क्षेत्रात दमदार व कसदार लेखिका म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे.लोकजीवनातील लोकतत्त्वे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितातील वसा आणि वारसा आहेत. कथात्म मराठी साहित्यामध्ये लोकतत्वे सर्वत्र योजलेली दिसतात. पारंपरिक लोकजीवन लोकतत्वांनी भरलेले आणि भारलेले आहे. मराठी लेखकांनी साहित्यसर्जनामधून या लोकतत्वांचा समुचित वापर केला आहे. ते मराठी वाचक व रसिकांना आकृष्ट करतात.
मराठीतील प्रथितयश लेखक व्यंकटेश माडगूळकर. प्रस्तुत समीक्षाग्रंथ ‘व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथात्म साहित्यातील लोकतत्वे’. यामधून कथात्म साहित्यातील लोकतत्वीय संदर्भमूल्ये अध्ययन संशोधनाच्या निराळ्या मानदंडांची प्रचिती देतात.
साहित्य हे मानवी जीवनाचे नितळ प्रतिबिंब, सामुदायिक अभिव्यक्ती आणि वैश्विक धारणा/ जाणिवांचा उत्कट आविष्कार असते. माडगूळकर यांच्या कथात्म साहित्यातील सामाजातील पारंपरिक पाऊलखुणा शोधताना लोकसंचितामधील कल्पनामय आणि मनोमय बाबींचे प्रभावी उपयोजन अनमोल ठरले आहे. लोकमानसातील रंग- तरंग – अंतरंग यांचे प्रतिबंध शोधताना प्रस्तुत ग्रंथ साकारला. सदर ग्रंथाचे अभ्यासक – समीक्षक निश्चितच स्वागत करतील !!
- विठ्ठल जंबाले.