• Language: मराठी
• Author: डॉ. ज्ञानदेव नेमाजी राऊत
• Category: संशोधन लेखन
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: १८८
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788195144419
भारतीय कृषिव्यवस्था ही केवळ 'गरिबी' पिकविणारी व्यवस्था म्हणून ध्यानात घेतली जाते. कारण देशातील गरिबी ही शेतीत पिकली जाते, ही वास्तविकता खोडण्याचे कार्य अनेकांनी केलेले आहे. 'उत्तमखेती'चे सूत्र आज कोणालाही पटणारे नाही. परंतु या साऱ्या समजुतीला काही अंशी वैचारिक छेद देण्याचे कार्य ऐंशीच्या दशकात 'शरद जोशी' नावाच्या विचारपद्धतीने केले आहे. शेतकरी संघटना नावाची एक स्वतंत्र अशी विचारपद्धती आपल्या कार्यातून आणि आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना ज्ञात आहे. 'शेतकरी संघटना' ही काहीएक मागण्यासाठी संघटित झालेली नाही, तर ती एक जीवन पद्धती म्हणूनच लोकमानसात बिंबविण्याचा प्रयत्न झाला.
स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदविण्याच्या या विचारधारेने साहित्यव्यवहारही अपवाद राहिलेला नाही. या पाव शतकाच्या विचार चळवळीने आमच्या जाणिवा, संवेदना आणि अनुभवाच्या कक्षाही रुंद करण्याचे कार्य केलेले आहे. हे डॉ. ज्ञानदेव राऊत यांच्या 'शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचे अनुबंध' या साहित्यकृतीतून आपल्याला लक्षात येते. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हा जीवनाच्या मोलाशी, भावाशीही निगडित आहे. शेतीमालाचाच प्रश्न नव्हे तर शेतकऱ्यांच्या जीवनमोलाचाही प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे, हे यातून अधिक उद्गारीत व्हावे.
- भास्कर चंदनशिव