• Book name: वाचू नाचू आनंदाने
• Language: मराठी
• Author: सदानंद पुंडपाळ
• Category: कथासंग्रह
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: ८८
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
सुप्रसिध्द कथाकार आणि 'गझल' प्रकार समर्थपणे हाताळणारे कवी श्री.सदानंद पुंडपाळ, यांनी मूल्यशिक्षणाचे उत्तम मार्गदर्शन करणारे अकरा कथांचे पुस्तक बालकुमार वाचकांच्या हाती दिले आहे. श्री. पुंडपाळ यांचा मूळ पिंड हा हाडाच्या शिक्षकाचा आहे. त्यामुळे समाजाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांना लाभली आहे. त्यामुळेच 'सहज बोलणे तरी हितोपदेश' या न्यायाने त्यांनी कथेचे माध्यम वापरू न मूल्यांचे महत्त्व बिंबवले आहे. या पुस्तकात एकूण अकरा कथा असून स्वातंत्र्याचे मोल, माणुसकीचे दर्शन, मारू का मला, पैशाचा पाऊस, खरी फुले, आगगाडीतला चोर या कथांची नावेही किती समर्पक आहेत! या कथांमध्ये एक मूल्य सांगितले आहे. पिंजऱ्यातील पिलाच्या कथेतून स्वातंत्र्याचे मोल शिकायला मिळते, त्याचप्रमाणे आपल्या वाढदिवसाच्या खर्चाचे पैसे दुष्काळग्रस्तांना देऊन माणुसकीचे दर्शन घडवणारे रवींद्र आणि त्याचे बाबा इथे भेटतात. आपल्या अवती भवतीला असणाऱ्या कोणत्याही गोष्टी टाकाऊ नसतात, त्यांचा उपयोग माणसाला होतोच होतो. त्याचबरोबर फ्लॉरन्स नाइटिंगेलच्या कथेतून प्रतित होणारी सेवापरायणता अशी अनेक मूल्य मुलांना शिकता येतात. या ठिकाणच्या सर्वच कथा अत्यंत प्रभावी आहेत, चटकदार आहेत. त्या पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशाच आहेत, त्यामुळे त्या सर्वांन वाचल्याच पाहिजेत, एक उत्कृष्ट कथासंग्रह वाचल्याचा आनंद बालकुमारांसह सर्वच आबालवृध्द वाचकांना नक्कीच मिळेल यात शंका नाही.
-प्रा.श्रीकांत नाईक